तुर्भ्यात अनधिकृत बुस्टर पंप जप्त

water connection

नवी मुंबई, 20 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर परिसरात 18 फेब्रुवारी रोजी धडक मोहीम राबवित महानगरपालिकेच्या जलवाहिनीवर अनधिकृतरित्या लावलेले बूस्टर पंप जप्त करण्यात आले.

या कारवाईदरम्यान काही नागरिकांनी महानगरपालिका करीत असलेल्या कारवाईस विरोध करुन महापालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.