कोकणात दमदार पाऊस

आज सरासरी 92.93 मि.मी. पावसाची नोंद

नवी मुंबई, 19 जुलै 2017/AV News Bureau:

कोकणात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून कोकण विभागात 19 जुलै  रोजी सरासरी 92.93 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चिपळुण तालुक्यात सर्वाधिक 212 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कोकणात नेहमीप्रमाणे पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतीची कामेही जोरात सुरू आहेत. नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तसेच धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.

जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे

  • ठाणे-109.51 मि.मी.
  • पालघर-44.24 मि.मी
  • रायगड-110.33 मि.मी.
  • रत्नागिरी-132.74 मि.मी.
  • सिंधुदुर्ग-136.88 मि.मी.