कोकण विभागात माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस

नवी मुंबई, 21 जुलै 2017/AV News Bureau:

कोकण विभागात आज सरासरी 52.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रायगड जिल्हयातील माथेरान  येथे  झाली आहे. माथेरानमध्ये 127.00 मि.मी. पाऊस झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेतीची कामेही यामुळे जोरात सुरू आहेत. सिधुंदुर्ग जिल्हात ७९ घरे, १६ गोठे आणि सार्वजनिक मालमत्ता असे मिळून ३८ लाख ३५ हजार ९७६ रूपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी

  • मुंबई शहर 18.00 मि.मी.
  • मुंबई उपनगर 41.00 मि.मी.,
  • ठाणे जिल्हा 74. 94 मि.मी.,
  • पालघर जिल्हा 61. 19 मि.मी,
  • रायगड जिल्हा 74. 43 मि.मी.,
  • रत्नागिरी जिल्हा 59. 84 मि.मी. तर
  • सिंधुदुर्गमध्ये 35. 13 मि.मी. पावासाची नोंद झाली आहे.