नवी मुंबई महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा संघ उपविजेता

  • कबड्डी जिल्हा अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 6 जून 2018:

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित 30 वी जिल्हा अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा 2018 यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा किशोर गटाचा संघ उपविजेता ठरला आहे.

महापालिकेच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या किशोर गटाने  28 व 29 वी असे दोन वर्षे ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धेत सतत विजेता संघ म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे. यावर्षी सदर संघाने एकूण दोनशेहून अधिक सहभागी संघातून ठाणे जिल्हयात अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रथम तालूकास्तरावर गटात विजयी झाले. त्यानंतर जिल्हा स्तरावर साखळी पध्दतीने खेळविलेल्या स्पर्धेत एकतर्फी विजयी मिळवून अंतिम आठ संघात स्थान मिळविले. उपउपांत्य फेरीपासून बाद पध्दतीने खेळविलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत शिवसमर्थ संघ, भिवंडी याबरोबर 5 गुणांनी, उपांत्य फेरीत जांभळे संघ, शहापूर यांना 15 गुणांनी मात करुन विजयी संपादन केले. अंतिम फेरीत जय बजरंग, वाशींद बरोबर अटीतटीच्या सामन्यात 1 गुणांनी पराभव झाले. त्यामुळे तिसऱ्या वर्षी उप विजेते पद मिळाले असून महापालिका संघातील दिपक केवट व रमेश बेनवासी या दोन खेळाडूंची ठाणे जिल्हा संघात निवड झालेली आहे.

  • सदर संघाचे महापालिकेच्या वतीने आयुक्त  डॉ.रामास्वामी एन. यांनी  संघातील खेळाडूंचे कौतूक केले. तसेच जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा प्रदान केले. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे उप आयुक्त नितीन काळे हेही उपस्थित होते.

 


इतर बातम्यांचाही मागोवा 

  • स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ

 

 

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड