ग्राहक तक्रारी सोडवण्यासाठी महावितरणचे मेळावे

मुंबई , 24 जुलै 2017/AV News Bureau:

महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा, नवीन वीज जोडणी, मीटर रीडिंग प्रमाणे वीज बिल अशा बाबतीत उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने ठाणे मंडळाअंतर्गत उपविभाग तसेच शाखा कार्यालय पातळीवर 25 आणि २6 जुलै रोजी ग्राहक मेळाव्यांचे आयोजन केले आहे.

या मेळाव्यात ग्राहकांच्या तक्रारीनुसार या अडचणी तात्काळ सोडवण्यावर भर राहणार आहे. या मेळाव्यात ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यास महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत. मेळाव्या बाबतची अधिकची माहिती ग्राहकांच्या संबंधित कार्यालयात उपलब्ध आहे.

मेळाव्यांचा तपशील

  • कळवा उपविभाग – 25 जुलै सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत
  • कोलशेत उपविभाग – 25 जुलै सकाळी 3 ते दुपारी 5 पर्यंत
  • ईश्वरनगर उपविभाग, भांडुप (पू.) उपविभाग व पन्नालाल उपविभाग – 26 जुलै सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत