“चौपाटी फेस्टिवल” मधून स्वछतेचा संदेश

 नवी मुंबई, 26 डिसेंबर 2016 / AV News Bureau :

नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीनं २३ ते २५ डिसेंबर या काळात चौपाटी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी संगीतकार शंकर महादेवन  यांनी उपस्थित राहून नागरिकांना  स्वछतेचा संदेश दिला. मन उधाण वाऱ्याचे , सबसे आगे होगे हिंदुस्थानी या गाण्यां बरोबरच ” चक चका चक नवी मुंबई .. ” ही जिंगल देखील म्हटली.

नवी मुंबईचा मी रहिवाशी आहे आणि मी जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत या शहराला सोडणार नाही. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कि आपण आपले शहर स्वछ ठेवले पाहिजे. स्वछता सर्वेक्षणामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे महादेवन यांनी सांगितलं.

शेवटच्या दिवशी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून बुगी वूगीचे बिट्टू सिंग हे होते. कार्यक्रमाचे आयोजक उपमहापौर अविनाश लाड तसेच माजी नगरसेविका प्रणाली लाड यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम तसेच सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आली. शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा लघुपट या वेळी उपस्थित प्रेक्षकांना दाखविण्यात आला, या कार्यक्रमाला अभिनेत्री शीतल पाठक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.