गणपती स्पेशल गाडीचे डबे कमी केले

मुंबई, 18 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

गणपती उत्सवासाठी दादर-रत्नागिरी-दादरदरम्यान चालविण्यात येणाऱ्या 01185/01186 (साप्ताहीक) या गाडीचे डबे कमी करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.

गाडी क्रमांक 01185/01186 दादर-रत्नागिरी-दादर (साप्ताहीक) या गाडीला पूर्वी 17 डबे जोडले होते. त्यामध्ये 2 टायर एसी 1 डबा, 3 टायर एसी 1 डबा, स्लीपर कोच 7, जनरल डबे 6 आणि एसएलआर 2 डबे होते. मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून 3 टायर एसी आणि जनरलचे 2 डबे रद्द करण्यात आले आहेत.

गाडी क्रमांक 01185/01186 च्या डब्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे. एकूण 15 डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये 2 टायर एसी 1, स्लीपर कोच 8, जनरल 4 आणि एसएलआर 2 डबे असणार आहेत. प्रवाशांनी हे बदल लक्षात घ्यावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.