मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई, 18 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यंदा मिटल्याचे चित्र आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक म्हणजे 90.97 टक्के इतके पाणी आहे. 16 ऑगस्टपर्यंत सर्व धरणांमध्ये 13 लाख 16 हजार 734 दशलक्ष लीटर पाणी जमा झाले आहे. गेल्या दोन वर्षांत प्रथमच पाणी साठ्याने नव्वदी ओलांडली आहे असून यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

2015 मध्ये पावसाने कमी हजेरी लावल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा कमालीचा खालावला होता. त्याचा परिणाम मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागले होते. मात्र गेल्यावर्षी पावसाने मुंबईकरांना हात दिला. त्यामुळे पाणी साठा 90 टक्क्यांच्या घरात पोहोचला होता. यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून तलावांमधील पाणी साठ्याने नव्वदी  पार केल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाने दिली आहे.  गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पाणी साठा वाढला असून मुंबईकरांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे. दरम्यान, तलावक्षेत्रात अद्याप पाऊस पडत असून तलावांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईकरांना यंदा पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही, अशी आशा आहे.

 

 मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील वाढलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे (16 ऑगस्ट रोजी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार)

 

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील 2016 व 2017 मधील पाणी साठ्याची माहिती (16 ऑगस्ट रोजी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार)