वनाशेजारील गावातील कुटुंबांस सवलतीत गॅस

  • राज्य मंत्रीमंडळाचा महत्वाचा निर्णय

मुंबई, 12 सप्टेंबर 2017/AV News Bureau:  subsidise gas cylinders

वनाशेजारील गावातील शंभर टक्के कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  subsidise gas cylinders

वनाशेजारील गावांतील लोक सरपणासाठी वनक्षेत्रात जातात. त्यामुळे वनातील हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अशा नागरिकांचा मृत्यू अथवा जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.  त्यासोबतच जळावू लाकडासोबत झाडांना नव्याने आलेल्या फुटव्याची जाणता-अजाणता तोड होत असल्याने वन संपदेवर प्रतिकूलपरिणाम होत आहे. याशिवाय स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर केल्याने धुरामुळे महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. महिलांच्या आरोग्याचा विचार करण्यासहराज्यातील वनांचे संरक्षण आणि त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेत व्याघ्र बफर क्षेत्रातील गावे तसेच अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून दोन किलोमीटर पर्यंतच्या गावाबरोबरच इतर वनांशेजारील गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये ग्राम परिस्थितीकीय विकास समिती स्थापन करून त्यामार्फत योजना राबविण्यात येणार आहे.

  • डॉ. श्याममाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमध्ये नमूद गावांबरोबरच वनाशेजारील इतरही गावांना स्वपयंपाक गॅस (LPG) पुरवठा करण्यासाठी समावेश करण्यात आला आहे. तेथील 100 टक्केा कुटुंबांना सवलतीच्या दराने गॅस पुरवठा करण्यात येणार आहे.
  • या योजनेमध्येा समाविष्टस गावांच्यान 100 टक्के कुटुंबांना गॅस कनेक्शन देताना सोबत भरलेले दोन सिलेंडर व प्रथम वर्षाचे उर्वरित कालावधीसाठी सहा असे प्रथम वर्षाकरिता एकूण आठ सिलेंडर व दुसऱ्या वर्षाकरिता सवलतीच्या दरात  सहा सिलेंडर दिले जातील.
  • यासाठी 75 टक्के शासकीय अनुदान तर 25 टक्केत लाभार्थ्याचे योगदान हे सुत्र ठरविण्यात आले आहे. लाभार्थ्यांकडून  दोन वर्षात 14 सिलेंडर वापरले न गेल्यास शिल्लक सिलेंडर पुढील वर्षी देता येतील.
  • या योजनेसाठी  2017-18 या वर्षासाठी 25 कोटी रुपयांची  अर्थसंकल्पीय तरतूद  केली आहे.
  • यापूर्वी वनालगतच्या गावात सवलतीच्या दराने गॅस वाटपाबाबत काढण्यात आलेल्या 10 जुलै 2012 च्यास शासन निर्णयामध्ये सिलेंडरच्या  संख्येसबाबतच्या तरतूदीमध्ये सुध्दा वरीलप्रमाणे प्रथम वर्षी आठ सिलेंडर व दुसऱ्या वर्षाकरिता एकूण  सहा सिलेंडर अशी सुधारणा  करण्यात आली आहे.