31 डिसेंबर 2023 पर्यंत थकीत मालमत्ता कर भरल्यास दंडात 100 टक्के सूट

ठाणे महानगरपालिकेची नागरिकांसाठी मालमत्ता करासाठी अभय योजना

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 13 डिसेंबर  2023

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने आकारण्यात आलेली शास्तीमध्ये (पुर्णत: अंशत:) सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे.

जे करदाते दिनांक 15 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित  महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100 % सवलत देण्यात येणार आहे.

बातमी वाचा : धुळे जिल्ह्यात गुंगीच्या औषधांची चोरट्या विक्रीसाठी साठा करणारी चौकडी जेरबंद

जे करदाते 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी व कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 25 % रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीवर 75% सवलत देण्यात येणार आहे. तसेच जे करदाते दिनांक 16 जानेवारी, 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी व कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 50% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 50% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यानी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल, अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार नाही.

बातमी वाचा : महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते सायं. 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार सकाळी 10.30 ते दुपारी 4  व रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत कराचा भरणा करता येईल.

महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच  Google Pay, PhonePe, PayTm, BhimApp याद्वारे  करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

========================================================

========================================================