दिल्ली युनिव्हर्सिटी निवडणुकीत ABVP ला धक्का

  • भाजपच्या ABVP ला हरवून काँग्रेसची NSUI विजयी

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2017: delhi university student election

दिल्ली युनिव्हर्सिटीच्या निवडणुकीत भाजपशी जोडल्या गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (ABVP) काँग्रेसशी निगडीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) पराभवाची धूळ चारली आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीतील ABVP चे वर्चस्व मोडून काढत NSUI ने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर नाव कोरले आहे. गेली चार वर्षे दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद ABVP कडे होते. delhi university student election

NSUI च्या रॉकी तुशीद याने अध्यक्षपद काबीज केले आहे. याशिवाय उपाध्यक्षपदीही NSUIच्या उमेदवाराची वर्णी लागली आहे. तर ABVP ला संयुक्त सचिव आणि सचिवपदावर समाधान मानावे लागले आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत ABVP  ने 3 पदे पटकावली होती. तर NSUI ला सहसचिवपदावरच समाधान मानावे लागले होते. अध्यक्षपदासाठी ABVP तर्फे रजत चौधरी, AISA तर्फे पारुल चौहान, अपक्ष उमेदवार राजा चौधरी आणि उल्का हे उमेदवार होते. मात्र NSUI च्या रॉकी तुशीद याने साऱ्यांचे आव्हान मोडून काढले. या निवडणुकीत एकूण 43 टक्के मतदान झाले होते. delhi university student election

दरम्यान, देशात सध्या भाजपची लाट असताना दिल्ली युनिव्हर्सिटीतील तरुणाईने काँग्रेसप्रणित संघटनेला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.