डॉ. किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या आंदोलन

मुंबई, 5 मार्च 2017/AV News Bureau:

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत साहित्यिक डॉ कृष्णा किरवले यांच्या  कोल्हापुरात झालेल्या  हत्येचा  निषेध करण्यासाठी  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या दुपारी 2 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती रिपाइंच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हा पुरोगामी परिवर्तनवादी  चळवळीवरील  हल्ला आहे. आंबेडकरी विचारवंतांच्या हत्येने आंबेडकरी विचार संपू शकत नाही. विचारवंतांची हत्या होणे ही महाराष्ट्राच्या सामाजिक  लौकिकाला काळिमा फासणारी घटना आहे. डॉ कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय तर्फे चौकशी व्हावी आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करावी या मागणी साठी रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत उद्या आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात मुंबईतील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं (आठवले ) तर्फे करण्यात आले आहे.