ठाणे महापालिकेतील १९५  कर्मचाऱ्यांना पदोन्नती

ठाणे,17 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

ठाणे महापालिका आस्थापनावरील  एकूण १९५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात  आली आहे.  एकाच वेळी १९५कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची ही पहिलीच घटना असल्यानाने पालिकाकर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • महापालिकेच्या आस्थापनेवर विविध विभागात चतुर्थश्रेणी व तृतीयश्रेणी संवर्गात कर्मचारी कार्यकारत आहेत. चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी लिपिक पदासाठी असलेली शैक्षणिक पात्रता धारण केली असून १३१ शिपाई संवर्गातील  लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आहे.
  • ‘अ’ वर्ग लिपिक संवर्गातील ७ कर्मचाऱ्यांना उपखाते  पदावर पदोन्नती देण्यात आलीआहे.
  • ४६ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना ‘अ’ वर्ग लिपिक या पदावर पदोन्नती दिली गेली आहे.
  • फायरमनसंवर्गातील ५ कर्मचाऱ्यांना वाहनचालक (अग्निशामक )
  • निवडश्रेणी शिपाई/ शिपाई या संवर्गातील ६ कर्मचाऱ्यांना जमादार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे .