तिसऱ्या टप्प्यात १९५ तर चौथ्या टप्प्यात आतापर्यंत ९ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 3 एप्रिल २०१९ :

 लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 14 मतदारसंघात आतापर्यंत 195 उमेदवारांनी तर चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघात 9 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

  • तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज 81 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात 28 मार्चपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. तिसऱ्या टप्प्यात 4 एप्रिल 2019 ही नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आज 3 एप्रिल रोजी 81 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदारसंघात आज 2 (आजपर्यंत 8 उमेदवार), रावेर-5 (7), जालना-8 (21), औरंगाबाद 12 (25), रायगड 4 (12), पुणे-9 (13), बारामती-6 (13), अहमदनगर- 8 (12), माढा-9 (29), सांगली-4 (10), सातारा 1 (9), रत्नागिरी-सिंधुदुर्ग-2 (7), कोल्हापूर 10 (17) आणि हातकणंगले मतदारसंघात आज एका उमेदवाराने तर आजपर्यंत 12 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
  • 5 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी होणार असून 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघात आज 5 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून आतापर्यंत एकूण 9 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नाशिक मतदारसंघात आज 2 तर पालघर, मुंबई उत्तर-मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघातून प्रत्येकी एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले. चौथ्या टप्प्यात 2 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या टप्प्यातील अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार असून 12 एप्रिलला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.