नवी मुंबईत मनसेकडे युवकांची रीघ लागली

उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांचा पुढाकार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २२ सप्टेंबर २०२०

नवी मुंबईच्या राजकारणातील घडामोडी चांगल्याच वाढल्या असून घणसोली परिसरातील अनेक तरुणांनी नवी मुंबई उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून मनसेकडे शहरातील तरुणांचा ओढा वाढल्यामुळे राजकीय वर्तुळात चलबिचल सुरू झाली आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्यांचे दैनंदिन जीवन  ठप्प झाले आहे. अशावेळी  राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या परिने नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही अडल्या नडल्यांना मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून नवी मुंबई मनसेचे नेते प्रसाद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे तरुण कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. त्यामुळे शहराच्या अनेक भागातील इतर तरुणही मनसेत दाखल होत असल्याची माहिती प्रसाद घोरपडे यांनी दिली.

घणसोलीमधील असंख्य तरुणांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार मान्य करत व आमदार राजूदादा पाटील यांचे नेतृत्व स्वीकारत २० सप्टेंब रोजी मनसेत प्रवेश केल्याची माहिती नवी मुंबई उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी दिली.

या कार्यक्रमाला घणसोली विभाग अध्यक्ष रोहन पाटील, कोपरखैरणे विभाग अध्यक्ष गणेश वाडकर, उपविभाग अध्यक्ष नितेश नलावडे, वैभव अंबिके, बंटी पष्टे आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा