पश्चिम रेल्वेतर्फेही गणेशोत्सवासाठी गाड्या

मुंबई, 13 जुलै 2017/AV News Bureau:

गणेशोत्सवासाठी पश्चिम उपनगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेवून मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेतर्फेही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. अहमदाबाद, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकातून मंगळुरू जंक्शन,करमाळीपर्यंत या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

  1. गाडी क्रमांक 09001 आणि 09002 मुंबई सेंट्रल-बंगळुरू जंक्शन- मुंबई सेंट्रल
  • गाडी क्रमांक09001 मुंबई सेंट्रल-बंगळुरू जंक्शन ही विशेष साप्ताहिक गाडी बुधवारी (23 आणि 30 ऑगस्ट रोजी) रात्री 11.15 ला मुंबई सेंट्रलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरु स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक09002 बंगळुरू जंक्शन- मुंबई सेंट्रल ही विशेष साप्ताहिक गाडी गुरुवारी (24 आणि 31 ऑगस्ट रोजी) रात्री 10.30 ला बंगळुरू स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.25 ला मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मदुरे, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, भतकळ, मुकांबिका रोड, बायंदूर, कुंदापुरा, उडुपि आणि मुल्कि या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

  • डब्यांची रचना

2 टायर एसीचे 2 डबे, 3 टायर एसीचे 8 डबे, स्लीपरचे 3 डबे आणि 2 एसएलआर डबे जोडण्यात येतील.

  1. गाडी क्रमांक 09009 आणि 09010 वांद्रे-करमाळी-वांद्रे
  • गाडी क्रमांक 09009 वांद्रे-करमाळी ही 20,22,25,27 ऑगस्ट, 1 व 3 सप्टेंबर रोजी (दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवार) रात्री 11.35 ला वांद्रे स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 09010 करमाळी-वांद्रे ही 21,22,26,28 ऑगस्ट, 2 व 4 सप्टेंबर रोजी (दर सोमवार, बुधवार आणि शनिवार) रात्री 8.30 ला करमाळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.5 ला वांद्रे स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा,माणगाव,खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मदुरे, थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

  • डब्यांची रचना

या गाडीला 2 टायर एसी 1, 3 टायर एसी 3, 10 स्लीपर, 4 जनरल आणि 2 एसएलआर डबे जोडण्यात येतील.

3.गाडी क्रमांक09416/09415 अहमदाबाद-करमाळी-अहमदाबाद

  • गाडी क्रमांक09416 अहमदाबाद-करमाळी ही 21,24,28,31 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता अहमदाबादहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक09415करमाळी- अहमदाबाद ही 22,25,29 ऑगस्ट,1आणि 5 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 ला करमाळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.30 अहमदाबादला पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना गेराटपुर,नादियाड, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नवसारी, वलसाड, वापी, डहाणू रोड, बोइसर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

2 टायर एसी 1 डबा, 3 टायर एसी 3 डबे, 8 स्लीपर कोच, 3 जनरल डबे,2 एसएलआरडी डबे जोडण्यात येतील .