रत्नागिरी-कोल्हापूर दरम्यान शिवशाही धावणार

मुंबई, 25 सप्टेंबर 2017/AV News Bureau: ratnagiri-kolhapur-ac-shivshahee

रत्नागिरी ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. एसटीची वातानुकूलित बस शिवशाही आणि रत्नागिरी ते कोल्हापूर दरम्यान चालविण्यात येणार आहे. शिवशाहीचा हा गारेगार प्रवास फक्त 227 रुपयांत होणार असल्यामुळे प्रवाशांचा या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

एसटी महामंडळाने यापूर्वी मुंबई ते रत्नागिरी अशी शिवशाही बस सेवा सुरू केली होती. या बससेवेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर पुणे-लातूर मार्गावरही शिवशाही बस सुरू करण्यात आली. त्यामुळे आता एसटीची ही वातानुकूलित बससेवा इतर मार्गावरही सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार आता रत्नागिरी-कोल्हापूर या नव्या मार्गावरही वातानुकूलित शिवशाही बस धावणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अशी धावणार शिवशाही ratnagiri-kolhapur-ac-shivshahee

  • रत्नागिरीवरून सकाळी 9.30 ला बस सुटणार
  • कोल्हापूरहून  दुपारी 2.45 ला बस सुटणार
  • तिकिट दर : 227 रुपये