सिंहगड एक्सप्रेसमधून मुलीच्या अपहरणाचा डाव उधळून लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा उपसभापती निलम गोऱ्हेंकडून सत्कार

सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा डाव विफल 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 13  फेब्रुवारी 2024 

एका पोलीस अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे सिंहगड एक्सप्रेसमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीचा अपहरणाचा डाव फसला. एका पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत आपल्या हुशारीने  उल्पवयीन मुलीचा जीव वाचला.  एखाद्या चित्रपटाचा प्रसंग भासावा असा भयानक प्रकार सिंहगड एक्सप्रेसमध्ये नुकताच घडला. या घटनेतील पोलीस अधिकाऱ्याच्या हुशारीची विधान परिषदेच्या उपसभाती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दखल घेतली आणि थेट विधान भवनात पाचारण करून “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद आपल्या कर्तव्यबुद्धीने जपणारे सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि अभिनंदन पत्र देवून सन्मान केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे हे  ८ फेब्रुवारी रोजी सिंहगड एक्सप्रेसने पुण्याला कोर्ट कामासाठी जात  होते. ननवरे यांना रेल्वेच्या डब्यात ३० वर्षीय इसम ८ वर्षीय मुलीला घेऊन प्रवास करीत असताना दिसला. आठ वर्षांची ती चिमुरडी आणि तो इसम यांच्या वागण्या बोलण्यात विचित्रपणा जाणवत होता. ही बाब पोलीसी संस्कार अंगी बाणवलेल्या ननवरे यांच्या नजरेतून या ३० वर्षीय इसमाच्या संशयास्पद हालचाली सुटल्या नाहीत. कारण मुलगी मराठीमध्ये बोलत होती  आणि तो इसम हिंदी मधून बोलत होता.

परिस्थिती संशयास्पद वाटल्यामुळे ननवरे यांनी  सावधपणे  दोघांशी संवाद साधत माहिती घेण्यास सुरुवात केली. त्या दोघांच्या बोलण्यात एकवाक्यता नसल्यामुळे ननवरे यांचा संशय आणखी बळावला. कारण  एकदा तो ३० वर्षीय इसम म्हणजे दयानंदकुमार शर्मा (बिहार) ही आपली मुलगी असे सांगायचा तर कधी ही आपली बहीण आहे असे सांगायचा. त्यामुळे ननवरे यांनी त्या इसमाच्या नकळत मुलीला हळू हळू बोलते करून घरच्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली. संभाषणादरम्यान, त्या मुलीला आपल्या मामाचा मोबाईल क्रमांक तोंडपाठ असल्याने ननवरे यांचे काम सोपे झाले. त्यांनी तात्काळ मुलगीचे मामा  सचिन शेलार यांच्याशी संपर्क साधला.

मामाने आपल्या बहिणीशी संपर्क साधून मुलीची माहिती घेतली आणि तातडीने आपली भाची पळवून नेली जात असल्याचे ननवरे यांना तात्काळ कळविले. मुलीच्या अपहरणाची बाब स्पष्ट होताच ननवरे यांनी त्या इसमाला पोलीस खाक्या दाखवला आणि मुलीला ताब्यात घेतले.  त्यानंतर मुलीच्या मामाला  तातडीने पुणे स्टेशनवर बोलवण्यात आले आणि मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दक्ष पोलीस अधिकारी ननवरे यांच्या सतर्कतेमुळेच आरोपी शर्मा याचा मुलीला पळवून नेण्याचा डाव उधळला गेला. ननवरे यांनी सावधानता बाळगली नसती तर आरोपो शर्मा यांचे दृष्ट हेतू पूर्ण झाले असते.

महिला जागृती आणि सबलीकरणासंदर्भात सदैव कार्यमग्न असणा-या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांच्या कानावर ननवरे यांचे प्रसंगावधान आणि त्यामुळे मुलीचे टळलेले अपहरणाबाबतची हो घटना जाताच त्यांनो या कामगिरीबद्दल त्यांना विधानभवनातील आपल्या दालनात निमंत्रित केले आणि त्यांचा सन्मान केला.  याबाबत डॉ, गोन्हे यांनी  ननवरे यांनी केलेल्या सन्माननीय कामाबाबत लेखी अभिनंदनाचे पत्र ही लिहीले.

यावेळी डॉ. गो-हे यांनी आपल्या मुलांबाबत पालकांनी जागरुक रहावे व अनोळखी व्यक्तीसोबत त्यांना शाळेत अथवा घराबाहेर पाठवू नये असे आवाहनही केले आहे.

========================================================

========================================================

========================================================