गाईडेड बॉम्बची यशस्वी  चाचणी

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2017:

स्वदेशी बनावटीचा हलक्या वजनाचा गाईड बॉम्ब एसएएडब्ल्यू अर्थात स्मार्ट ॲण्टी एअरफिल्ड वेपनची शुक्रवारी (3 नोव्हेंबर) ओडिशातील चंडिपूर येथे हवाई दलाच्या विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान या बॉम्बने अचूक दिशादर्शक प्रणालीच्या मदतीने 70 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. या बॉम्बमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार असून लवकरच हा बाँबचा संरक्षण दलात समावश केला जाणार आहे.

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ, संशोधन केंद्र इमरात (आरसीआय) तसेच डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा आणि भारतीय हवाई दलानं हा बॉम्ब विकसित केला आहे.

 

  • या बाँबच्या वेगवेगळं वातावरण आणि अंतरासाठी तीन चाचण्या घेण्यात आल्या आणि तीनही चाचण्या यशस्वी झाल्या.

 

  • संरक्षण मंत्री निर्मला सितारमन आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनी डीआरडीओचे संशोधक आणि भारतीय हवाई दलाचे  अभिनंदन केलं आहे.

 

गाईड बॉम्बची ठळक वैशिष्ट्ये

  • गाईड बॉम्बचे वजन सुमारे 120-150 किलो
  • मारक क्षता- 80 ते 100 किलो मीटर
  • हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम
  • भारतीय हवाई दलाच्या जाग्वार, सुखोइ-30 एमकेआय विमानातून लक्ष्याचा वेध घेणे शक्य