बेलापूर मधील शिवमंदीर सागरी किनारा येथे स्वच्छता अभियान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 11 मार्च 2023

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ११ मार्च रोजी रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत बेलापूर कार्यक्षेत्रात शिवमंदिर सागरी किनारा येथे स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

यावेळी युथ ब्रँड अँबेसिडर, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू  शुभम वनमाळी, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉ बाबासाहेब राजळे , विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे, स्वच्छता अधिकारी  पवन कोवे, बेलापूर विभाग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग ,साफसफाई कामगार तसेच मँगोज सोल्जर चे सदस्य ,ज्ञानदीप स्कूल व कॉलेजचे विद्यार्थी ,फादर एंगल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज वाशी NSS विद्यार्थी ,SIES कॉलेज नेरूळ NSS विद्यार्थी ,तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज NSS विद्यार्थी, सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज NSS विद्यार्थी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले तसेच अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नवी मुंबईत स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशात स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त करणाऱ्या नवी मुंबई शहरातील नागरिकही मोठ्या  उत्साहाने या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत आहे. तसेच आपले शहर स्वच्छ रहावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे समुद्र किनारी तसेच विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा  राबवित आहेत.


======================================================== अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र