मध्य रेल्वेचा रविवारी (26 नोव्‍हेंबर)मेगा ब्लॉक

मुंबई, 25 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी तसेच तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेने मेन आणि हार्बर मार्गावर येत्या रविवारी (26 नोव्हेंबर ) मेगाब्लॉक जाहीर केला आहे.  या मेगाब्लॉकमुळे दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 26 november mega block on central railway

मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 पासून ते सायंकाळी 4.15 वाजेपर्यंत

 सकाळी 10.37 ते दुपारी 3.56 वाजेपर्यंत कल्‍याणहून अप जलद मार्गावर निघणा-या सर्व उपनगरीय गाड्या दिवा आणि परळ स्‍थानकादरम्‍यान धीम्‍या मार्गावर वळविण्‍यात येतील. या गाड्या परळ स्‍थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील.  परळ स्‍थानकापासून या गाड्या अप जलद मार्गावर वळविण्‍यात येतील.  या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळे पेक्षा 20 मिनटे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील.

  • छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील जलद गाड्या आपल्‍या निर्धारित थांब्‍या व्‍यतिरिक्‍त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि दिवा स्‍थानकावर थांबतील. या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळे पेक्षा 20 मिनटे उशिरा धावतील.
  • छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00 या काळात डाऊन तसेच अप मार्गावरील धीम्‍या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनटे उशीरा धावतील.

लांब गाड्यांचे वेळापत्रक

  • ब्‍लॉक काळात दादर/छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणा-या सर्व मेल/एक्‍सप्रेस गाड्या मुलुंड व माटुंगा स्‍थानकादरम्‍यान अप स्‍लो लाइन मार्गे धावतील व आपल्‍या गंतव्‍य स्‍थानंकावर 20 मिनटे उशीरा पोहचतील.
  • 50104 रत्‍नागिरी-दादर पॅसेंजर गाडी सेवा दिवा स्‍थानकावर समाप्‍त करण्‍यात येईल
  • 50103 दादर-रत्‍नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्‍थानकातून सुटेल.
  • 50103 गाडीच्‍या प्रवाशांसाठी दादर ते दिवा विशेष उपनगरीय गाडी चालविण्‍यात येईल. ही दादरहून 3.40 वाजता सुटेल आणि ठाणे स्‍थानंकावर 4.06 वाजता पोहचेल आणि 4.13 वाजता दिवा स्‍थानकावर पोहचेल.

कुर्लावाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सांयकाळी 4.10 वाजेपर्यंत

  •  छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस वरून सकाळी 10.34 ते दूपारी 3.39  या काळात पनवेल / बेलापुर /वाशी येथे जाणा-या तसेच पनवेल / बेलापुर / वाशी येथून सकाळी 10.21 ते दूपारी 3.41 वाजेपर्यत छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस च्‍या दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
  • ब्‍लॉक काळात छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला- छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी-पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल चालविण्‍यात येतील.
  • ब्‍लॉक काळात सकाळी 10.00 ते दूपारी 4.30 वाजेपर्यत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्‍स हार्बर/मुख्‍य मार्गावर प्रवास करण्‍याची सवलत देण्यात आली आहे.