विजय चौगुलेंचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजिनामा ?

नवी मुंबई, 12 जानेवारी 2017/अविरत वाटचाल:

नवी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विजय चौगुले यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजिनामा दिल्याचे पत्र महापौर कार्यालयाला प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

विजय चौगुले यांनी वैयक्तिक कारणामुळे आपण स्थायी समिती सदस्यत्वाचा राजिनामा देत असल्याचे महापौर कार्यालयाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  महापौर कार्यालयानेदेखील विजय चौगुले यांच्या राजिनामा मंजूरीसाठी प्रशासनाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

या राजिनामा पत्राबाबत शहानिशा करण्यासाठी विजय चौगुले यांच्याशी संपर्क साधला. मात्र आपण शहराबाहेर असून नवी मुंबईत आल्यानंतर याबाबत सविस्तर खुलासा करू, असे सांगितले.