तुर्भे येथे ‘सैराट ’ वर कारवाई

नवी मुंबई, 7 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

तुर्भे,सेक्टर 19, ए.पी.एम.सी  मार्केट परिसरातील  हॉटेल सैराट येथील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.  सैराटवरील या कारवाईनंतर अनधिकृ बांधकामे करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. हॉटेल  सैराट येथील अनधिकृत बांधकामास तुर्भे  विभाग  कार्यालयामार्फत  एम.आर.टी.पी.  कायदा  1966  मधील कलम  53(1) अन्वये  नोटीस  बजावण्यात  आली  होती.  मात्र नोटीशीनंतरही हॉटेल व्यवस्थापनाने अनधिकृत बांधकाम काढून घेतले नव्हते. त्यामुळे तुर्भे विभागामार्फत  जोरदार  कारवाई  करत अनधिकृत  किचन,  बाथरूम  शेड, गेट, तसेच  टेरेसवरील पत्राशेड तोडण्यात आली.

 

हे  अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या खर्चापोटी 1 लाख रुपये इतकी रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात आली आहे. तसेच पुढील काळात सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी स्पष्ट केले.