मुंबईत 6 एप्रिलला भाजपचा महामेळावा

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 4 एप्रिल 2018:

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी, 6 एप्रिल रोजी मुंबईत पक्षाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या मेळाव्याला पक्षाच्या बूथस्तरापासून ते प्रदेश पातळीवरील सर्व कार्यकर्ते या महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे आमदार, विभागीय संघटनमंत्री, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटन महामंत्री, मंडलाध्यक्ष तसेच किसान मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जनजाती मोर्चा व युवा मोर्चाचे पदाधिकारी अशा हजारो पदाधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून समूह संवाद साधत मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

  • 6 एप्रिल 1980 रोजी मुंबई मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत भाजपाची स्थापना झाली. आज भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. देशाच्या 22 राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे. सर्वात जास्त आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच, दलित व आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी अशी भाजपाची भक्कम वाटचाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून बीकेसीतील तयारीची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बीकेसी येथे सभा स्थळाची आणि तेथे होत असलेल्या तयारीची स्वत: जाऊन पाहणी केली आणि तेथे उपस्थित कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधला. मंचव्यवस्था, कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था, कार्यकर्त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग, सुरक्षा आदी सर्व व्यवस्थेबाबतचा तपशील त्यांनी बारकाईने जाणून घेतला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार, मोहित खंबोज आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

=====================================================================================================================================================================

 

 

  • हॅंडलूम उत्पादनांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न