नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधात आक्रमक कारवाई

नवी मुंबई, 4 एप्रिल 2018,अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून बेलापूर, घणसोली व कोपरखैरणे येथील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्याचे आदेश  महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

  • बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रांतर्गत से. 15 येथील भूखंड क्रमांक 61 कबाना हॉटेल यांनी केलेले अनधिकृत वाढीव बांधकाम तोडण्यात आले. या हॉटेलमध्ये मागील बाजूस अनधिकृत वाढील किचन व लॉफ्ट असे एकूण 500 चौ.फूट बांधकाम करण्यात आले होते. सदर वाढीव अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53(1) अन्वये रितसर नोटीस बजावण्यात आली होती. त्या विरोधात संबंधितांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर निकाल नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने लागल्याने अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने ही धडक कारवाई केली. या मोहीमेत कारवाईपोटी रु. 50 हजार इतकी रक्कम दंड स्वरुपात वसुल करण्यात आली.

 

  • घणसोली विभाग कार्यक्षेत्रामधील कैलास नाईक यांनी बांधलेली घुंघट नगर येथील चार मजली अनधिकृत इमारत तसेच दलुभाई जगदाळे राबाडागांव यांची 1 मजली आर.सी.सी. अनधिकृत इमारत त्याचप्रमाणे दत्ता पाटील यांची दोन मजली आर.सी.सी. इमारत अशा तिन्ही अनधिकृत बांधकामांवर घणसोली विभागाचे सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई केली.

 

  • कौपरखैरणे विभाग क्षेत्रात अतिक्रमण विरोधी मोहीम कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त अशोक मढवी यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर 06 येथील एस.एस. टाईप रुम नं.565, 563 येथे घरमालकाने केलेले वाढीव अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्यात आले.

 

============================================================================================================

 

मागोवा

मालमत्ता कर वसूलीविषयी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांचे मत