दहावीचा नवीन अभ्यासक्रम अ‍ॅप्लिकेशन बेस

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे मत

मुंबई,4 एप्रिल 2018/अविरत वाटचाल न्यूज:

आजच्या काळात इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज आहे. पण मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेतले तर ज्ञानात अधिक भर पडते. कृतीयुक्त, उपयोजनात्मक (अ‍ॅप्लिकेशन बेस) असा दहावीचा नवीन अभ्यासक्रम असेल, त्याचा फायदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी निश्चित होईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अभ्यासमंडळातील विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या दहावीच्या सर्व माध्यमांच्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन आज दादर येथील शिवाजी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात झाले.त्यावेळी  तावडे यांनी यावर्षीपासून बदलण्यात आलेल्या दहावीच्या अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी बालभारतीचे संचालक सुनील मगर यांच्यासह भाषातज्ज्ञ उपस्थित होते.

येत्या शैक्षणिक वर्षापासून 8 वी, 10 वीचा नवीन अभ्यासक्रम

यंदाच्या 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे.सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. त्‍यामुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या हातात नव्या अभ्‍यासक्रमाची नवी पुस्तके येणार आहेत. याआधी इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम 2013-14  या शैक्षणिक वर्षात बदलण्यात आला होता पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी अभ्यासक्रमाचे नवीन आराखडे, त्यांची उद्दिष्टे आणि अभ्यासक्रम बदल अशी विविध माहिती बालभारतीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मराठी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या प्रमुख विषयांसह द्वितीय आणि तृतीय भाषा विषयांच्या अभ्यासक्रमाचे आराखडेही बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

  • बालभारतीचा अभ्यासक्रम शिकत असलेले विदयार्थी सीबीएससी आणि आयसीएससीच्या विदयार्थ्यांना टक्कर देऊ शकतील याची खात्री वाटते. या पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येक पाठाला क्यूआर कोड देण्यात आला असून डिजिटल अभ्यासक्रमाकडे ही कुच आहे असे म्हणता येईल. क्यूआर कोडच्या सहाय्याने सर्व गाव खेड्यातील विद्यार्थीही इंटरनेटमुळे जोडले जाणार आहेत. नवीन अभ्यासक्रमामध्ये अध्ययन निश्चिती (Learning outcome) याचाही समावेश आहे, असे तावडे म्हणाले.

 

  • पूर्वी दहावीच्या निकालांमध्ये पास किंवा नापास असे असायचे .पण आता नापास असा शिक्का गुणपत्रिकेवर नसतो. उत्तीर्ण आणि कौशल्य सेतू असे यामध्ये नमूद असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. स्वविकास आणि संरक्षणशास्त्र या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थी खूप काही शिकतील असा विश्वास वाटतो, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

 

  • गेल्या वर्षापासून सुरु असलेली इयत्ता सातवी ते दहावीच्या वर्गांसाठी अभ्यासक्रमाच्या बदलाची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांसाठीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमात शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, जबाबदार नागरिकत्वाचे भान, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आल्याचेही  तावडे यांनी सांगितले.

 

============================================================================================

मागोवा

दंतवैद्यक शास्रातील  ‘सुदर्शन’