मोदी सरकारने स्वप्ने दाखवली,पुढे काय?

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल

सांगली-आटपाडी,४ एप्रिल 2018,अविरत वाटचाल न्यूज:

मोदी सरकारने स्वप्ने दाखवली… आश्वासने दिली…शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देवू बोलले…२ कोटी तरुणांना नोकऱ्या देण्याचे सांगितले…परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे सांगितले… यापैकी एक तरी पूर्तता या सरकारने केली का ? असा सवाल विधीमंडळ पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या आजच्या आटपाडी येथील तिसऱ्या दिवसाच्या जाहीर सभेत पवार बोलत होते.

  • द्राक्षे, मोसंबीच्या बागा जगवण्यासाठी शरद पवारसाहेबांनी भरपूर पैसा दिला. परंतु आज याच बागायतदारांना हे सरकार काहीच दयायला तयार नाही. आज देशाचे कृषीमंत्री कोण हे शेतकऱ्यांना माहित नाही. सरकारच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांबाबत आपलेपणा राहिलेला नाही असा आरोप अजित पवार यांनी केला.

 

  • शेतकऱ्यांच्या काकडीला साडे आठ पैसे दर मिळत आहे तर वांग्याला किलोला एकोणसत्तर पैसे दर मिळत आहे. कसं जगायचं शेतकऱ्यांनी ? असा सवाल अजित पवार यांनी केला.

 

  • सध्या सिमेंटचे दर वाढले, वाळू मिळेनासी झाली त्यामुळे घरं बांधणं मुश्किल झालंय आणि हे सरकार शौचालये बांधायला सांगत आहे.  तुम्ही सिमेंटचे दर वाढवताय, वाळू देत नाहीय, पाणी देत नाहीय आणि शौचालये बांधायला सांगताय…शौचालय बांधून करायचं काय? त्यात जायला पोटात काय हवं ना ? अशी  टिका पवार यांनी केली.

 

=================================================================================================================================

मागोवा

पनवेल शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त काय म्हणाले ?