ग्राहकांसाठी महावितरणचा नवीन  टोल फ्री क्रमांक

 अविरत वाटचाल न्यूज/ मुंबई, 6 एप्रिल 2018:

महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती मिळावी तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण आठवडयातील सातही दिवस व 24 तास करण्यासाठी महावितरणने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. या टोल फ्री  क्रमांकापैकी 1800-200-3435 या क्रमांकात बदल करण्यात आला आहे.  या क्रमांकाऐवजी आता ग्राहकांना 1800-102-3435 या नवीन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे, असे महावितरणने जाहीर केले आहे.

  • टोल फ्री क्रमांक
  1. 19120
  2. 1800-102-3435
  3. 1800-233-3435