मुंबईत 50 ठिकाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार

  • पर्यावरण मंत्री रामदास कदम

अविरत वाटचाल न्यूज/ मुंबई,6 एप्रिल 2018:

मुंबईत 50 ठिकाणी आणि राज्यातील पाच महानगर पालिका क्षेत्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. मंत्रालयात स्ट्राटा इनव्हिरो कंपनीतर्फे प्रदूषण यंत्रणे संदर्भातील सादरीकरण बैठकीत ते बोलत होते.

  • रस्त्यावर गाड्यांची संख्या वाढली आहे. ट्रॅफिक सिग्नल, बस आणि रेल्वे स्थानके, टोल नाके, वाहन तळ, पेट्रोल पंप, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवेत प्रदूषण होते. धूर आणि धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रदूषण कमी करायचे असेल तर प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबई शहरात जवळपास 50 ठिकाणी आणि पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

  • स्ट्राटा इनव्हिरो कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर देशातील बेंगलुरु, दिल्ली, गोवा आणि ठाणे येथे ही प्रदुषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे. संपूर्ण देशात 2019 पर्यंत शंभर शहरात ही यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमोल चापेकर यांनी सांगितले.

 

  • या प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचे वैशिष्ट्य म्हणजे हवेतील धूळ, विषारी वायू शोषून घेते. शुद्ध हवा बाहेर टाकते. विविध ठिकाणी ही यंत्रणा मोफत बसविली जाणार असल्याचे चापेकर यांनी सांगितले.