मुंबई-नागपूर समृध्दी मार्गासाठी मलेशियाचे सहकार्य

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 17 जुलै 2017/AV News Bureau:

नागपूर- मुंबई द्रुतगती समृध्दी महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी  होण्याची तयारी मलेशिया सरकारने दाखविल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मलेशियाच्या एका शिष्टमंडळाने आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृध्दी महामार्गाची माहिती दिली.

भारत आणि मलेशियाचे फार जुने संबंध आहेत. विविध क्षेत्रात त्यांनी सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवला आहे. विशेषत: रस्ते, पूल, भुयारी मार्ग कामात त्यांनी उच्च  दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन मजबूत आणि सुरक्षित रस्ते तयार केले  आहेत. समृध्दी महामार्ग हा महाराष्ट्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात काम करण्याची मलेशियाने तयारी दाखवली ही आनंदाची गोष्ट आहे. समृध्दी महामार्गाबरोबरच अन्य रस्त्यांच्या प्रकल्पात  देखील  सोबत  काम करु, असेही शिंदे यांनी सांगितले.