उपायुक्त काळेंकडे वाहन, क्रिडा,सांस्कृतिक विभाग

  • अविरत वाटचाल न्यूज/ नवी मुंबई, 9 एप्रिल 2018:

नवी मुंबई महापालिकेत नव्याने रुजू झालेले उपायुक्त नितिन काळे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात वाहन, क्रिडा आणि सांस्कृतिक विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. क्रिडा सांस्कृतिक विभाग शिक्षणाधिकारी संदीप संगवे तर वाहन विभाग उपायुक्त तृप्ति सांडभोर यांच्याकडे होता.

 

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रशासनाची घडी व्यवस्थित बसवण्याच्या दृष्टीने तसेच प्रशासकीय कामाला वेग यावा यासाठी काही पावले उचलली आहेत. त्यातूनच काळे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात वाहन,क्रिडा आणि सांस्कृतिक विभागाचा कार्यभार सोपवला आहे.

काळे हे कृषी पदवीधर असून त्पायांनी पाच वर्षे शासनाच्या कृषी विभागात काम केलेले आहे. सहकार विभागात उपनिबंधक म्हणून कामकाजाचा अनुभव असून उपनिबंधक एसआरए, उपनिबंधक म्हाडा, जिल्हा उपनिबंधक ठाणे अशा पदांवर मुंबई, ठाण्यात काम केलेले आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या अभिहस्तांतरण व पुनर्विकासाबाबत तसेच गृहनिर्माण संस्थांना विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्याचे त्यांनी काम केले आहे.

=======================================================================================================

मागोवा

पनवेल शहराला पाणी पुरवठा करण्याचा मुद्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्त