अवघ्या वयाच्या 7 व्या वर्षी स्वरांश कोळीला भूमिपुत्र सन्मान पुरस्कार

  • अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
  • नवी मुंबई, 22 डिसेंबर 2021

दि. बा. पाटील मोहत्सव 2021 च्या निमित्ताने एकविरा कला संस्था आणि तेजस पाटील आयोजित ‘’भूमिपुत्र सन्मान पुरस्कार बेलापूर येथील अवघ्या 7 वर्षांच्या स्वरांश सागर कोळी याला मिळाला आहे. मास्टरमाइंड नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये विजेता ठरलेल्या स्वरांशला  उरण जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील सांस्कृतिक मंगल कार्यालयात 19 डिसेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 22 व्यक्तींना भूमिपुत्र सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. विशेष म्हणजे अवघ्या वयाच्या 7 व्या वर्षी  भूमिपुत्र सन्मान पुरस्कार मिळवणारा पहिला पुरस्कार विजेता म्हणून स्वरांश सागर कोली ठरला आहे. अवघ्या वयाच्या 6 व्या वर्षी  मास्टरमाइंड नैशनल चैम्पीयन्शिपचा विजेता ठरलेल्या स्वराशला  भूमीपुत्र पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व थरातून त्याचे कौतूक करण्यात येत आहे.

=================================================\

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप