फुकट्या प्रवाशांकडून एनएमएमटीची सव्वा सहा लाखांची दंड वसुली

दंड वसुलीच्या रकमेत 34% नी वाढ

अविरत वाटचाल

नवी मुंबई , 21 एप्रिल 2018:

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसेस मधुन दररोज साधारणपणे 2.6 लाख प्रवाशी प्रवास करतात. या प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करण्यासाठी 52 तिकीट तपासणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. सन 2017 – 2018 मध्ये 5 हजार 252 फुकटया प्रवाशांकडून. 6 लाख 22 हजार ,469 रूपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. 2016 – 2017 मध्ये 4095 फुकटया प्रवाशांकडुन.4लाख 63 हजार 106 रूपयांची- दंड वसुली करण्यात आली होती. 2016 – 2017 च्या तुलनेत या वर्षी दंड वसुलीच्या रकमेत 34% वाढ झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये वातानुकुलीत आणि सर्वसाधारण अशा एकुण 452 बसेस असुन त्यापैकी 415 बसेस रस्त्यावर धावतात. सदयस्थितीत एकुण 75 मार्गावर दररोज 126699.2 कि.मी. बसेस धावतात. यामध्ये वातानुकुलीत बसेसचे 11 मार्ग असुन सर्वसाधारण बसेसचे 64 बस मार्ग आहेत. उपरिवहन उपक्रमाचा विस्तार मुंबई, ठाणे, कल्याण – डोबिंवली, बदलापूर, उरण व पनवेल पर्यंत आहे..

अपघात

परिवहन उपक्रमामध्ये तुर्भे, आसुडगाव व घणसोली आगारामध्ये एकुण 981 चालक काम करीत आहेत. वर्षातून तीन वेळा चालकांना प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये अपघात कमी करणे, इंधनाची बचत करणे, सुरक्षित प्रवास व व्यसनमुक्ती याचा समावेश होतो. चालकांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे सर्वसाधारण बसेसच्या इंधन प्रतिकिमी मध्ये वाढ झालेली असून पूर्वी 3.2 कि.मी. प्रतिलिटर वरुन सध्या 3.6 कि.मी. प्रतिलिटर अशी वाढ झालेली आहे.

सन 2016 -2017 मध्ये एकुण 199 अपघात झालेले असून यामध्ये 06 मरणांकीत, 10 गंभीर व 13 मोठे अपघात झालेले असतो.

सन 2017 – 2018 मध्ये एकुण 146 अपघात झालेले असून यामध्ये 05 मरणांकीत, 05 गंभीर व 10 मोठे अपघात झालेले आहेत. सन 2016 – 2017 च्या तुलनेत या वर्षी अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.

वातानुकुलीत बस सेवा

परिवहन उपक्रमामार्फत एकुण 11 वातानुकुलीत बस मार्गावर सेवा दिली जाते. या वातानुकुलीत बससेवेचे तिकीट दर कमी करण्याच्या अगोदर दररोज सरासरी 8500 प्रवाशी वातानुकुलीत बससेवेचा लाभ घेत होते. यामध्ये वाढ होवून आज अखेर 12000 प्रवाशी या बससेवेचा लाभ घेत आहेत.