25 एप्रिल रोजी नो हाँकींग डे

 अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 24 एप्रिल 2018:

जागतिक ध्वनी प्रदूषण जनजागृती दिनी मुंबई शहराला ध्वनी प्रदूषण मुक्त करण्यासाठी दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी 1 ते 2 या कालावधीत ‘नो हाँकींग डे’ साजरा करण्यात येणार आहे.

 

  • दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातील बुधवारी ध्वनिप्रदूषण जनजागृती दिवस साजरा केला जातो. यावर्षी कान, नाक, घसा तज्ञांच्या संघटनेमार्फत उद्या २५ एप्रिल रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

 

  • अनावश्यक तसेच कर्ण कर्कश्श हॉर्न वाजवू नये तसे केल्यास त्याचा विपरित परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सर्वांनी ध्वनिप्रदूषण मुक्ततेसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 

ध्वनी प्रदूषणामुळे मानवी शरीरावर वाईट परिणाम होत असून यामुळे चिडचिडेपणा, बहिरेपणा, रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार उद्भवतात. विशेषता लहान मुले व गर्भवती महिलांना ध्वनी प्रदूषणाचा विपरित परिणाम होतो. हे सर्व टाळण्यासाठी मुंबई शहरात जनजागृती करण्यासाठी नो हाँकींग डे साजरा करण्यात येत आहे. त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.