केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे निधन

नवी दिल्ली, 18 मे 2017:

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. दवे यांच्या आकस्मिक निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. काल संध्याकाळी दवे यांच्यासोबत विविध महत्वांच्या विषयावर चर्चा केली आणि आज त्यांच्या निधनाची वार्ता कळल्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे मोदींनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमित तयार झालेले दवे 2009 पासून ते राज्यसभेवर होते. ते मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात दवे यांना सामावून घेतले आणि त्यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी दिली होती. दवे यांच्याकडे नर्मदा नदीच्या संवर्धनाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती .

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि अन्य मान्यवरांनी दवे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदी यांनी ट्विटरवरून दवे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

modi tweets