वन महोत्सवात 1 लाख झाडे लावणार

  • नवी मुंबई महानगरपालिकेचा संकल्प

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 24 एप्रिल 2018:

दरवर्षीप्रमाणेच 1 जुलै पासून वनमहोत्सवसाजरा करण्यात येत असून जुलै महिन्यात संपूर्ण राज्यभरात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प नजरेसमोर ठेवण्यात आला आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 1 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  • 1 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी वृक्षप्राधिकरण सदस्य व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी तसेच वन विभाग आणि वन विकास महामंडळ यांच्या अधिकारीवर्गासह वृक्षारोपण करावायाच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी केली व वृक्षारोपणाचे नियोजन केले. यावेळी सभागृहनेते रविंद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, बहादूर बिस्ट, उषा पाटील आदी वृक्ष प्राधिकरण सदस्य तसेच वृक्ष प्राधिकरण सचिव उपआयुक्त तुषार पवार, वन विभागाचे अधिकारी देशमुख, वन विकास महामंडळाचे अधिकारी गौड आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

  • यामध्ये इलठणपाडा, यादवनगर, रबाले, सुलाई माता डौगर व गवळीदेव डोंगर परिसराची पाहणी करून त्याठिकाणी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. सदर भाग हा वन विभागाच्या अखत्यारित असल्याने वन विभाग व नवी मुंबई महानगरपालिका आणि वन विकास महामंडळ यांनी त्रिपक्षीय करार करून हे वृक्षारोपण करावे यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.