जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एक हजारहून अधिक वृक्षलागवड

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 23 एप्रिल 2024

22 एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिन’(Earth Day) म्हणून साजरा केला जात असून पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचारपूर्वक वापर करणे आणि वाढते प्रदूषण रोखून पर्यावरणाचे संतुलन राखणे याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘वसुंधरा दिन’ अत्यंत महत्वाचा मानला जातो.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही जागतिक वसुंधरा दिवस (Earth Day) निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त उदयान विभागाच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मोठया संख्येने वृक्षारोपण करण्यात आले.

HEADLINE : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते से.26, नेरुळ येथील झोटींगदेव मैदान याठिकाणी पिंपळवृक्ष रोपाची लागवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त  शिरिष आरदवाड, शहर अभियंता  संजय देसाई, उदयान विभागाचे उपआयुक्त  दिलीप नेरकर, नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त अमोल पालवे, कार्यकारी अभियंता राजेश पवार, उदयान अधिक्षक  भालचंद्र गवळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

LATEST NEWS : आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष द्या

त्याचप्रमाणे वसुंधरा दिनानिमित्त नवी मुंबईत 9 विविध ठिकाणी एक हजारहून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे लागवड करण्यात आलेली सर्व वृक्षरोपे ही देशी प्रजातीची होती. ज्यामध्ये पिंपळ, वड, बहावा, बकुळ, ताम्हण, सोनचाफा, जांभुळ, कदंब अशा देशी वृक्षरोपांचा समावेश होता. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्राधान्याने पक्ष्यांना हवेहवेसे वाटेल अशी फळे व फुले असलेली देशी वृक्षरोपे लागवड करण्यात यावीत व या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या जैवविविधतेमध्ये लक्षणीय भर पडेल अशा वृक्षरोपांची लागवड करण्याच्या सूचना दिलेल्या असून त्यानुसार फळाफुलांनी बहरणारी वृक्षरोपे लावण्यात येत आहेत.

LATEST STORY : मध्य रेल्वे – १७१ वर्षांचा अभूतपूर्व प्रवास

वसुंधरा दिनानिमित्त नेरुळ सेक्टर – 26 येथील झोटींगदेव मैदानाप्रमाणेच वाशी सेक्टर – 10 येथील मीनाताई ठाकरे उद्यान, पामबीच मार्ग सर्व्हिस रस्ता, से-10, सानपाडा येथील संवेदना उदयान, आर्टिस्ट व्हिलेज बेलापूर तलावानजिक, निसर्गोदयान कोपरखैरणे, सेंट्रल पार्क घणसोली, ठाणे बेलापूर मार्गावर कोपरखैरणे भुयारी मार्गाजवळ, से-14 ऐरोली गुरुव्दाराजवळ, दिघा रामनगर येथील बोराले तलावाजवळ अशा नऊ ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार एक हजाराहून अधिक वृक्षरोपांचे संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, उदयान अधिकारी, व स्वच्छता अधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. ही वृक्षारोपण मोहीम सुरूच असणार आहे.

========================================================


========================================================

========================================================