कळंबोली येथे कोकण विभागीय ध्वजारोहण

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 1 मे 2018:

महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन.पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, नवी मुंबई प्रशांत बुरूडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा पथक,  सिडको अग्निशमन दल पथक, नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, नवी मुंबई पोलीस श्वान पथक, बुलेट ब्रुफ वाहन, आर.आय.व्ही. वाहन, वज्र वाहन, बीडीडीएस वाहन, वरूण वाहन, अग्निशमन दल वाहन, आदिंनी संचलन केले. रस्ता सुरक्षा पंधरवडा निमित्त नवी मुंबई पोलिस  डान्स अकॅडमीने पथनाट्य सादर केले. यावेळी उत्कृष्ट सूत्र संचालनासाठी शुभांगी पाटील व निंबाजी गिते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास उपआयुक्त (सामान्य प्रशासन) महेंन्द्र वारभुवन, उपायुक्त (महसूल) सिताराम सालीमठ, उपायुक्त (करमणूक) शिवाजी कादबाने, उपायुक्त (विकास) गणेश चौधरी, उपायुक्त (पुरवठा) दिलीप गुट्टे, उपायुक्त (रोहयो) अशोक पाटील, पोलीस उपायुक्त डॉ.राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, पोलीस उपायुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त तुषार दोषी, पोलीस उपायुक्त नितीन पवार  तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.