हिट अँड रन अपघातांमधील नुकसान भरपाईबाबत केंद्राची नवी अधिसूचना जारी

गंभीर जखमींना 50 हजार तर मृतांच्या निकटवर्तीयांना 2 लाख रुपये

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 28 फेब्रुवारी 2022:

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनांच्या हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी नवी योजना अधिसूचित केली आहे. 1 एप्रिल 2022 पासून जुन्या भरपाई योजना 1989 ऐवजी ही नवी योजना लागू होणार आहे.

  • वाढीव नुकसानभरपाईची तरतूद

25 फेब्रुवारी 2022 रोजी जाहिर करण्यात आलेल्या या अधिसूचनेनुसार मंत्रालयाने गंभीररीत्या जखमी झालेल्यांसाठी आता साडेबारा हजार रुपयांची नुकसानभरपाई वाढवून 50,000 करण्यासाठी आणि अशा अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या निकटवर्तीयांना 25,000 ऐवजी 2 लाख रुपये इतकी  वाढीव नुकसानभरपाईची तरतूद केली आहे. नुकसानभरपाई मिळविण्यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि पीडितांना प्रत्यक्ष भरपाई मिळणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी कालमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे.

मंत्रालयाने मोटार वाहनांच्या अपघात निधीची उभारणी , परिचालन, निधीचे स्रोत इत्यादींसाठी देखील 25 फेब्रुवारी 2022 रोजी काही नियम जाहीर केले आहेत. हा निधी हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी, जखमींच्या उपचारासाठी आणि केंद्र सरकारने विहित केलेल्या इतर तत्सम कारणांसाठी वापरला जाईल.

——————————————————————————————————