राज ठाकरे 5 ऑगस्टला नवी मुंबईत

  • महापालिका कामगारांचा राज्यस्तरीय महामेळावा 

अविरत वाटचाल न्यूज

1 ऑगस्ट 2018, नवी मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेतर्फे येत्या 5 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महापालिका कामगार महामेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.  वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात दुपारी 2 वाजता कामगारांचा राज्यस्तरिय महामेळावा होणार आहे. या महामेळाव्याला युवा नेते अमित ठाकरे हे देखील हजेरी लावणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी बेलापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी,  अमोल आयवळे आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दिर्घ काळानंतर राज ठाकरे नवी मुंबईतील एखाद्या जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे नवी मुंबई मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

  • उल्हासनगर, ठाणे, बदलापूर, मुंबई या महापालिकांमध्ये मनसेची महापालिका कामगार कर्मचारी सेना कार्यरत आहे. या सर्व महापालिकांमधील कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी हा महामेळावा होणार आहे. नवी मुंबई महापालिकेतही मागील सहा महिन्यांपासून कामगार सेनेने काम करण्यास सुरूवात केली आहे. सध्या 2 हजारांपेक्षा जास्त कामगार या युनियनचे सभासद आहेत. आठ महानगरपालिकांमध्ये सुमारे २० हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. 

 

मे 2017 रोजी किमान वेतन लागू झाल्यानंतरही नवी मुंबई मनपामधील सर्व विभागातील कंत्राटी कामगारांना वाढीव पगाराची रक्कम देण्यात आली नव्हती त्याची अमंलबजावणी करण्यात कामगार सेनेला यश आले. कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय लढ्यासाठी ही युनियन प्रामुख्याने काम करेल असेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले. कामगार कायद्याप्रमाणे संघटनेचे सभासद असलेल्या सर्व कामगारांना नोकरीत कायम करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचीही माहिती यावेळी देशपांडे यांनी दिली.

 

नवी मुंबई मनपातील कामगारांचा १३ महिन्यांचा किमान वेतनाचा फरक सुमारे ७० कोटी रुपये महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात घेण्यासाठी मनसेने पाठपुरावा केला व प्रशासनाकडून त्याची मंजूरी करून घेतल्याची माहिती गजानन काळे यांनी दिली.

  • यावेळी शशांक नागवेकर, पृथ्वी येरूनकर, अतुल भगत, एड.अक्षय काशीद, आप्पासाहेब कोठुळे,  राजेश उज्जैनकर, अभिजीत देसाई, रूपेश कदम, यातीन देशमुख, प्रसाद परब, संदीप गलुगडे, गोविंद सुप्पया, सविनय म्हात्रे, नितिन खानविलकर, जयंत सकपाळ, मिलिंद खाडे, आरती धुमाळ, अनीता नायडू, श्रीकांत माने, नीतिन चव्हाण, विलास घोणे, अभिलेश दंडवते, सनप्रीत तुरमेकर आदी उपस्थित होते.

===================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • रस्त्यांवरील खड्डे आणि मनसेचे खळखट्याक