प्रार्थनास्थळांच्या शेजारी शौचालय नको

घरोंदा वासियांची मागणी; पालिकेने प्रस्ताव बसनात गुंडाळला

नवी मुंबई, 11 एप्रिल 2017/AV News Bureau:

घणसोलीतील घरोंदा वसाहतीत असणा-या मैदानात पालिकेने सुलभ शौचायल उभारण्यास मंजुरी दिली होती. मात्र प्रार्थनास्थळांजवळ  हे शौचालय उभारण्यात येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला आहे. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन महापालिकेनेदेखील शौचालयाचा प्रस्ताव गुंडाळला आहे.

घरोंदा वसाहतीच्या बाजूला असलेल्या मैदानात सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी प्रस्ताव होता. मात्र ज्या ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार होते. त्याच्या आजुबाजूला धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे नागरिकांनी या शौचालय उभारणीला विरोध केला होता. तेथील  घरोंदा वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनी याविरोधात स्वाक्षरी मोहिम राबविली आणि ७०० ते ८०० कुटुंबानी या स्वाक्षरी मोहिमेत भाग घेतला.

दरम्यान, 9 एप्रिल रोजी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत मैदानाचे सुशोभिकरण आणि शौचालयाच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा स्थानिक नागरिक काळ्या फिती लावून कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि  नहाटा यांची गाडीच अडवून धरली. नागरिकांनी नहाटा यांनी परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर ते कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून गेले.

याप्रकरणी सर्व घरोंदा वासीय आणि सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी परिमंडळ २ चे उपायुक्त अमरीश पटनिगरे यांची भेट घेऊन महापालिकेच्या प्रस्तावित शौचालयाला विरोध असल्याचे निवेदन आणि नागरिकांच्या सह्यांचे पत्र दिले. उपायुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

याप्रकरणी मनसे नवी मुंबई शहर सचिव संदीप गलुगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्डअध्यक्ष आनंदराव तरटे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस विजय खोपडे, राष्ट्रवादी युवक निलेश पवार, सिद्धेश्वर को.ऑप. हौसिंग सोसायटी मधील खुशालराव जाधव, संतोष ढोले, अनिल चव्हाण, सिद्धिविनायक को-ऑप हौसिंग सोसायटीमधील विनोद शिंदे, महेंद्र खिल्लारी, युवराज औधडे, बाळकृष्ण जाधव, मानसिंग घाडगे, प्रकाश करमळकर, नवनाथ सरजिने, आदर्श को-ऑप हौसिंग सोसायटी मधील प्रमोद साळुंखे, शिवाजीराव पाटील, एफ टाईप को-ऑप हौसिंग सोसायटी मधील ध्यानदेव खणकर, माणिकराव बोराडे, शत्रुघ्न पडवळ, ओंकार को-ऑप हौसिंग सोसायटीमधील श्याम सुंदर पवार, बाळासाहेब जाधव, भाजप तालुका उपाध्यक्ष श्याम सराफ, दिनेश माने, भागवत खेडकर आणि श्री गणेश को-ऑप हौसिंग सोसायटी मधील सागर औटी आणि बाजीराव खामकर आदींनी महत्वाची भूमिका बजावली.