आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती 12 हजार

 

अविरत वाटचाल न्यूज

 मुंबई, 28 ऑगस्ट 2018:

केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या 6 हजार रुपये शिष्यवृत्तीत वाढ करुन ती आता 12 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना (National Means cum Merit Scholarship Scheme – NMMSS) सन 2008 पासून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आतापर्यंत दरवर्षी 6 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षातून 4 वेळा देण्यात येत होती आता मात्र दरवर्षी एकाचवेळी शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येणार आहे.

 

  • NMMSS परीक्षेत Scholastic Aptitude Test (SAT) आणि Mental Ability Test (MAT) अशा दोन्हींमध्ये मिळून किमान 40 टक्के (32 टक्के अजा/अज विद्यार्थ्यांकरिता) गुण असणे आवश्यक असल्याने यापूर्वीची प्रत्येक विषयात 40 टक्के गुण आवश्यक असण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे.

=========================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नेरुळ- खारकोपर रेल्वे मार्ग ऑक्टोबरपासून -सिडको एमडी