नो हेल्मेट…..नो एंट्री

नवी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांचा उपक्रम

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 13 नोव्हेंबर 2018:

दुचाकी चालवणा-या वाहनचालकांना आता महापालिका मुख्यालय ,विभाग कार्यालये इथे जाताना हेल्मेट वापरावे लागणार आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्यास उद्यापासून (14 नोव्हेंबर) कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेत काम करणा-या आणि कामानिमित्त येणा-या दुचाकी चालकांना हेल्मेट शिवाय महापालिका कार्यालय परिसरात प्रवेश देवू नये अशी विनंती करणारे पत्र  वाहतूक पोलिसांच्या सीवूडस् शाखेतर्फे महापालिका आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार आज महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर दुचाकीस्वारांना याबाबत जनजागृती करण्यात आली.

रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि दुचाकी चालकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने हेल्मेट वापरणे अतिशय आवश्यक आहे. मात्र असे असतानाही अनेक दुचाकीचालक हेल्मेट वापरत नाहीत. राज्याचे पोलीस महासंचालक(वाहतूक) यांनी याबाबतचे पत्र राज्यभरातील वाहतूक पोलीसांना पाठवले आहे. त्यानुसार सीवूडस वाहतूक शाखेने दुचाकी चालकांना हेल्मेट घालणे सक्तीचे करावे अन्यथा प्रवेश देवू नये अशी विनंती करणारे पत्र दिले होते.  विना हेल्मेट दुचाकी चालवणा-या चालकांमध्ये याबाबत जनजृती व्हावी यासाठी 13 नोव्हेंबरला महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुचाकीचालकांचे हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर 14 नोव्हेंबरपासून विनाहेल्मेट दुचाकी चालवणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतूक पोलिसांच्या या अभियानाला प्रतिसाद देत महापालिकेने सर्व विभागांमध्ये दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. हेल्मेट नसेल तर मुख्यालय, विभाग कार्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार  नाही.  तसे पत्र महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांना पाठवले असल्याची माहिती सीवूडस् वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी दिली.

======================================================================================================================================

इतरही बातम्यांचा मागोवा

विरूध दिशेने वाहने चालवणा-्या  वाहनचालकांवर कारवाई