सिडको सर्वेक्षणातील तपशील पडताळून घ्या

सिडकोने बांधलेल्या सदनिका आणि दुकानांच्या माहितीचा समावेश

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 12 नोव्हेंबर 2018:

सिडकोने बांधलेल्या सदनिका आणि दुकानांचा अद्ययावत तपशील जमा करण्यासाठी सिडकोतर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ www.cidco.maharashtra.gov.in वर प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या तपशीलाची पडताळणी करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या माहितीमध्ये विसंगती आढळून आल्यास दुरूस्तीसाठी सिडकोच्या सांख्य़िकी विभागात अर्ज करणे आवश्यक आहे.

सिडको महामंडळाने विविध नोड्समध्ये बांधलेल्या सदनिकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी धृव कन्सल्टंसी सर्विसेस लि. या एजन्सीला सर्वेक्षण करण्यासाठी नेमले होते. या सर्वेक्षणासाठी सिडकोने प्रश्नावली तयार केली होती. प्रश्नावलीचा अनुक्रमांक हाच एससीएस या दोन प्रकारांमध्ये विभागून निवासी व वाणिज्य वापराच्या संकुलांसाठी निश्चित करून मालमत्तेच्या दर्शनीय ठिकामी मार्करने लिहिण्यात आलेल्या क्रमांकाची प्रश्नावली संबंधित सदनिकाधारक,दुकानदार यांच्याकडून भरून घेण्यात आली होती.

या प्रश्नावलीसोबत आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडायच्या होत्या. ज्यांच्याकडून प्रत्यक्ष प्रश्नावली भरली गेली नाही व कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत. अशांची माहिती सिडकोकडे उपलब्ध असलेल्या संचिकांद्वारे भरण्यात आली आहे.ज्यांनी प्रश्नावली भरली त्यांची माहिती पडताळणी करून उर्वरित माहिती सिडकोकडे उपलब्ध असलेल्या संचिकांमधून भरण्यात आली आहे.

या माहितीचे विश्लेषण करून अद्ययावत तपशील तयार करण्यात आला आहे. त्याची पडताळी नागरिकांनी करावी असे आवाहन सिडकोच्यावतीने करण्यात आले आहे.

 

======================================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा

सिडकोनिर्मीत इमारतींच्या पनर्बांधणीबाबत ठोस निर्णय घेणार- महापालिका आयुक्त