श्री गणेश दिनदर्शिका २०१९ चे अजित पवार यांच्याहस्ते प्रकाशन

 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, २८ डिसेंबर २०१८:

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ९६/९७ नेरुळच्या वतीने छापण्यात आलेल्या  ” श्री गणेश दिनदर्शिका २०१९  ” चे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मुंबईत राष्ट्रवादी कांग्रेस भवन येथे करण्यात आले.

 

श्री गणेश दिनदर्शिका २०१९ मध्ये स्थानिक नगरसेविका रुपाली किस्मत भगत,आणि तालुकाध्यक्ष गणेश भगत व त्यांच्या सहकारी वर्गाने प्रभागात केलेल्या नागरी कामांची आणि प्रशासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिलेली आहे.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक, माजी खासदार व प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, माजी खासदार आनंद परांजपे,  आमदार संदीप नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. गणेश नाईक यांनी श्री गणेश दिनदर्शिकेचे प्रकाशन करत प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून समाजसेवेचा वसा निरंत चालू ठेवा असा सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

 

 

या दिनदर्शिका प्रकाशनप्रसंगी नेरुळ तालुका अध्यक्ष गणेश भगत, समाजसेवक आनंद पवार, संतोष चाळके, विट्ठल भोईटे, रविंद्र भगत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

=======================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक