आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुटुंबियांसोबत बजाविला मतदानाचा हक्क 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

पनवेल, २९ एप्रिल २०१९

सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी(दि. २९) आपला मतदानाचा हक्क बजावला. गुजराती शाळेमध्ये ठाकूर बंधूंनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले. त्याचबरोबर पनवेल पनवेलकरानांही मतदान करण्याचे आवाहन केले.

सोमवारी सकाळी ठाकूर बंधूंनी गुजराती शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर, तसेच अर्चना परेश ठाकूर यांनी मतदान केले. मतदान हा आपला हक्क आहे. आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे. त्यानुषंगाने पनवेलमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. 

=======================================

इतर बातम्यांचाही मागोवा