मावळमध्ये पार्थ पवार यांना धक्का, शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी किल्ला राखला

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मावळ, २३ मे २०१९

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा धक्कादायक पराभव मावळ मतदार संघात झाला. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा मोठय़ा मताधिक्क्याने पराभव झाला. पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी झंझावाती प्रचार केला. त्यामुळे पार्थ पवार यांचे पारडे काहीसे जड वाटत होते. मात्र मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल हाती आला. श्रीरंग बारणे यांना ७ लाख २० हजार ६६३ मते मिळाली. तर पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते मिळाली. बारणे यांनी २ लाख १५ हजार ९१३ मते अधिक मिळवली. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम नारायण पाटील यांनी ७५ हजार ९०४ मते आपल्याकडे खेचली. १५ हजार ७७९ मतदारांनी नोटा या पर्यायाला पसंती दिली.

मावळ लोकसभा मतदार संघ २०१९

क्रमांक उमेदवाराचे नाव पक्ष मते टक्केवारी
1 ॲड कानडे संजय किसन बहुजन समाज पार्टी 10197 0.74
2 पार्थ अजित पवार नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी 504750 36.87
3 श्रीरंग आप्पा चंदु बारणे शिवसेना 720663 52.65
4 जगदिश उर्फ अय्यप्पा शामराव सोनवणे क्रान्तिकारी जयहिन्द सेना 5242 0.38
5 जया संजय पाटील अम्‍बेडकराइट पार्टी ऑफ इंडिया 2328 0.17
6 पंढरीनाथ नामदेव पाटील बहुजन मुक्ति पार्टी 2570 0.19
7 प्रकाश भिवाजी महाडीक भारतीय नवजवान सेना (पक्ष) 1095 0.08
8 मदन शिवाजी पाटिल भारतीय प्रजा सुराज्य पक्ष 2243 0.16
9 राजाराम नारायण पाटील वंचित बहुजन अघाडी 75904 5.55
10 सुनिल बबन गायकवाड बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 1755 0.13
11 अजय हनुमंत लोंढे अपक्ष 1044 0.08
12 अमृता अभिजित आपटे अपक्ष 1696 0.12
13 नवनाथ निश्वनाथ दुधाळ अपक्ष 2802 0.2
14 प्रशांत उर्फ बाबाराजे गणपत देशमुख अपक्ष 6318 0.46
15 बाळकृष्ण धनाजी घरत अपक्ष 3603 0.26
16 राकेश प्रभाकर चव्हाण अपक्ष 3225 0.24
17 राजेंद्र मारूती काटे ( पाटील ) अपक्ष 1639 0.12
18 विजय हनूमंत रंदिल अपक्ष 2093 0.15
19 सुरज अशोकराव खंडारे अपक्ष 1873 0.14
20 सुरेश श्रीपती तौर अपक्ष 1083 0.08
21 डॉ. सोमनाथ उर्फ बाळासाहेब अर्जुन पोळ अपक्ष 970 0.07
22 NOTA वरीलपैकी कोणीही  नाही 15779 1.15
एकूण 1368872

 

इतर बातम्यांचाही मागोवा