16 एप्रिल रोजी हार्बर लाईनवर कोणताही ब्लॉक नाही

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 15 एप्रिल 2023
मध्य रेल्वे 16 एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या  कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक  घेणार आहे.मात्र हा मेगाब्लॉक मेन लाईनवर असणार आहे. तसेच हार्बर मार्गावर उद्या कोणताही मेगाब्लॉक जाहीर केलेला नसून रेल्वे सेवा नियमित सुरू राहणार असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.
SWAPNA’S FOOD TRACK YOUTUBE CHANNEL

सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन  त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील.   ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व  नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.
हार्बर लाईनवर यापूर्वी जाहीर केलेला मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आता हार्बर मार्गावर 16 एप्रिल रोजी मेगाब्लॉक असणार नाही.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL