राहुल गांधींनी अध्यक्षपदी कायम रहावे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसचा प्रस्ताव एकमताने मंजूर

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 30 मे 2019:

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीने आज एकमताने मंजूर केला.

आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याविषयीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पाठिंबा दिला व एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्यात मा. प्रदेशाध्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. सोशल इंजिनयरिंगच्या माध्यमातून सर्व समाजातील तरूणांना व नविन नेतृत्वाला संधी देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तसेच नवनियुक्त खा. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अभिनंदन करण्यात आले.