भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचार मोडीत काढणारा पक्ष

  • आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

पनवेल, २६ सप्टेंबर २०१९:

भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचार मोडीत काढणारा पक्ष आहे. गरजे पुरते कमवा आणि गरजेपुरते खावे, या अनुषंगाने चालणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज  बेलवली येथे झालेल्या पळस्पे जिल्हा परिषद विभागातील केंद्र आणि बूथ प्रमुखांच्या बैठकीत बोलताना केले. 

पनवेल भाजपा तालुका मंडलच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात झालेल्या या बैठकीला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ भोपी, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे , पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी पंचायत समिति सदस्य निलेश पाटील, ज्ञानेश्वर बडे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा अध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, शिल्पा पवार, अनेश ढवळे, यांच्यासह स्थानिक नेते, केंद्र प्रमुख आणि बूथ अध्यक्ष उपस्थित होते . यावेळी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भभ्रष्टाचार मोडीत काढण्यास सुरुवात केल्याने विरोधकांचे ढाबे दणाणले असल्याचे सांगून  आ. प्रशांत ठाकूर यांनी गरिबासाठी आणलेल्या विविध योजनांची माहिती दिली. आपल्या कुटुंबाचे बघावे आणि समाजाचे ही बघावे ह्या पध्दतीने चालणारा हा पक्ष आहे. त्यामुळे गरिबांच्या भल्यासाठी  काम करणार्‍या या पक्षाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्याला प्रशांत दादांना एक लाख मताधिक्याने निवडून द्यावयाचे असल्याने आपण धर्मग्रंथाचा अभ्यास करतो त्याप्रमाणे मतदार यादीचा अभ्यास करावा असा कानमंत्र अरुणशेठ भगत यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

==============================================

इतर बातम्यांचाही मागोवा